‘…हा देशाचा आणि अर्शदचा अपमान’, माजी क्रिकेटपटू पीएम शाहबाज शरीफवर का संतापला? जाणून घ्या
स्टार भालाफेकपटू अर्शद नदीमने पॅरिस ऑलिम्पिक २०२४ मध्ये सुवर्णपदक जिंकून पाकिस्तानसाठी ऐतिहासिक कामगिरी केली. यानंतर पंतप्रधान शाहबाज शरीफ यांनी त्याला ३ लाख रुपये रोख बक्षीस दिले, ज्यावर माजी क्रिकेटर दानिश कनेरिया यांनी संताप व्यक्त केला. अर्शदने आपल्या गावाच्या विकासासाठी रस्ते, गॅस आणि विद्यापीठाची मागणी केली. मायदेशी परतल्यावर चाहत्यांनी त्याचे जोरदार स्वागत केले.