‘पाकिस्तानला गंभीरसारख्या कणखर प्रशिक्षकाची गरज…’, दानिश कनेरियाचे वक्तव्य; म्हणाला…
पाकिस्तानला बांगलादेशविरुद्ध घरच्या कसोटी मालिकेत लाजिरवाणा पराभव पत्करावा लागला. यानंतर माजी खेळाडू दानिश कनेरियाने पाकिस्तान क्रिकेट बोर्डाला सल्ला दिला की, पाकिस्तानला गौतम गंभीरसारख्या कणखर प्रशिक्षकाची गरज आहे. कनेरियाने सांगितले की, पाकिस्तानमध्ये सर्व काही हलक्यात घेतले जात आहे आणि सतत कर्णधार बदलले जात आहेत. त्यामुळे कठोर निर्णय घेऊन कर्णधाराला एक वर्षाची संधी द्यावी.