दुलीप ट्रॉफीमध्ये ७ विकेट्स आणि ७ मेडन षटकं टाकणारा…कोण आहे मानव सुथार?
दुलीप ट्रॉफी २०२४ मध्ये युवा खेळाडू मानव सुथारने आपल्या चमकदार कामगिरीने सर्वांना प्रभावित केले आहे. इंडिया डी विरुद्ध ७ बळी घेत, त्याने इंडिया सी संघाला विजय मिळवून दिला. राजस्थानच्या श्रीगंगानगरमध्ये जन्मलेल्या सुथारने प्रशिक्षक धीरज शर्माच्या मार्गदर्शनाखाली गोलंदाज म्हणून नाव कमावले. देशांतर्गत क्रिकेटमध्ये १४ सामन्यात ६५ विकेट्स घेतलेल्या सुथारने यंदाच्या आयपीएलमध्ये गुजरात टायटन्सकडून पदार्पण केले.