हार्दिक पंड्या नताशाशी घटस्फोट झाल्यानंतर ‘या’ गायिकेला करतोय डेट? जाणून घ्या कोण आहे ती?
भारताचा क्रिकेटर हार्दिक पंड्या आणि नताशा स्टॅनकोविक यांनी १८ जुलै रोजी घटस्फोट घेतला. आता घटस्फोटानंतर हार्दिक ब्रिटिश गायिका जॅस्मिन वालियाला डेट करत असल्याच्या चर्चा आहे. दोघांनी ग्रीसमध्ये एकत्र सुट्टी घालवतानाचे फोटो आणि व्हिडिओ शेअर केले आहेत. जॅस्मिनने हार्दिकच्या व्हिडिओला लाइक केल्याने चर्चांना आणखी बळ मिळाले आहे.