स्त्री की पुरूष खेळाडू या वादामुळे चर्चेत आलेल्या इमेन खलिफने उचलले मोठे पाऊल
अल्जेरियन बॉक्सर इमेन खलिफ पॅरिस ऑलिम्पिक २०२४ मध्ये स्त्री की पुरुष खेळाडू या वादामुळे चर्चेत आली होती. इमेनवर सोशल मीडियावर टीका झाली होती की ती महिला नसून पुरुष आहे. आता तिने चीनच्या यांग लिऊचा पराभव करून सुवर्णपदक जिंकले. यानंतर तिने ऑनलाइन छळाविरोधात तक्रार दाखल केली. इमेनने स्पष्ट केले की ती एक स्त्री आहे आणि तिचे आयुष्य स्त्रीप्रमाणेच जगत आहे.