दाऊदाचा एक फोन, जीवे मारण्याचे अनेक प्रयत्न, ललित मोदींनी सांगितले क्रिकेट सोडण्याचे कारण
आयपीएलचे माजी आयुक्त ललित मोदी यांनी अलीकडील मुलाखतींमध्ये खळबळजनक खुलासे केले आहेत. एएनआयला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमकडून मिळालेल्या धमक्यांचा उल्लेख केला. दाऊदच्या टोळीच्या धमक्यांमुळे क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्याचे त्यांनी सांगितले. आयपीएलमध्ये बेटिंगवर डी-कंपनीचे नियंत्रण असल्याचेही त्यांनी उघड केले. क्रिकेटमधून निवृत्त होण्याचे आश्वासन दिल्याचेही मोदींनी स्पष्ट केले.