मनू भाकेर-नीरज चोप्राची सोयरीक जुळली? मनूच्या वडिलांनी केले मोठे वक्तव्य
पॅरिस ऑलिम्पिक २०२४ नंतर नीरज चोप्राने नेमबाज मनू भाकेर व तिच्या आईची भेट घेतली, ज्याचा व्हीडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. या व्हीडिओमुळे नीरज आणि मनूच्या नात्यावर चर्चा सुरू झाली. मनूच्या वडिलांनी स्पष्ट केले की मनू अजून लहान आहे आणि लग्नाच्या वयाचीही नाही. नीरजचे काकाही या चर्चांना नाकारत म्हणाले की, नीरजच्या लग्नाची माहिती सर्वांना मिळेल.