अवघ्या एका सेंटीमीटरने हुकलं नीरज चोप्राचं डायमंड लीग स्पर्धेचं जेतेपद
नीरज चोप्राने ब्रुसेल्स डायमंड लीग २०२४ अंतिम फेरीत ८७.८६ मीटर थ्रोसह दुसरे स्थान मिळवले. ग्रेनेडाच्या अँडरसन पीटर्सने ८७.८७ मीटर थ्रो करून पहिला क्रमांक पटकावला. नीरजने पहिल्या थ्रोमध्ये ८६.८२ मीटर, दुसऱ्या थ्रोमध्ये ८३.४९ मीटर, तिसऱ्या थ्रोमध्ये ८७.८६ मीटर, चौथ्या थ्रोमध्ये ८२.०४ मीटर, पाचव्या थ्रोमध्ये ८३.३० मीटर आणि शेवटच्या थ्रोमध्ये ८६.४६ मीटर थ्रो केला.