सुवर्णपदक हुकल्यानंतर नीरज चोप्राच्या आईचं पाकिस्तानच्या अर्शद नदीमबद्दल मोठं विधान
पॅरिस ऑलिम्पिकमध्ये नीरज चोप्राने रौप्यपदक जिंकले, तर पाकिस्तानच्या अर्शद नदीमने सुवर्णपदक पटकावले. नीरजच्या आईने मुलाच्या यशाबद्दल आनंद व्यक्त करताना अर्शदच्या विजयाबद्दलही समाधान व्यक्त केले. नीरजच्या वडिलांनीही अर्शदच्या यशाचे कौतुक केले. सोशल मीडियावर नीरजच्या आईच्या खिलाडू वृत्तीचे कौतुक होत आहे, विशेषतः पाकिस्तानमधील युजर्सकडून.