“ऑफर चांगली आहे पण…”, भारताच्या ऑलिम्पिक पदकविजेत्या खेळाडूने का नाकारली सरकारी नोकरी?
पॅरिस ऑलिम्पिक २०२४ मध्ये नेमबाजीत कांस्यपदक जिंकणाऱ्या सरबज्योत सिंगने हरियाणा आणि पंजाब सरकारने दिलेली सरकारी नोकरी नाकारली आहे. त्याने सांगितले की, नोकरी चांगली आहे पण, त्याला सध्या शूटिंगवर लक्ष केंद्रित करायचे आहे. सरबज्योतला हरियाणा सरकारने २.५० कोटी रुपयांचे रोख बक्षीस दिले आहे. त्याने यापूर्वीही अनेक आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये भारतासाठी पदके जिंकली आहेत.