ऑलिम्पिकचे आयोजन भारतात करण्याबाबत पंतप्रधान मोदींचे मोठे वक्तव्य
स्वातंत्र्यदिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्ल्यावर भाषण करताना खेळाप्रती आपली बांधिलकी व्यक्त केली. त्यांनी पॅरिस ऑलिम्पिक २०२४ मधील भारतीय खेळाडूंचे कौतुक केले आणि पॅरालिम्पिक खेळाडूंना शुभेच्छा दिल्या. मोदींनी २०३६ ऑलिम्पिकचे भारतात आयोजन करण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे सांगितले.