‘जसप्रीत बुमराह कर्णधार नको’, रवी शास्त्रींचा विरोध; कारण काय?
भारताचे माजी क्रिकेटपटू रवी शास्त्री यांनी रोहित शर्माच्या निवृत्तीनंतर भारताच्या पुढील कसोटी कर्णधारासाठी तरुण खेळाडू निवडण्याचे आवाहन केले आहे. जसप्रीत बुमराहला कर्णधारपद देण्यास त्यांनी विरोध केला असून, शुभमन गिल किंवा ऋषभ पंत यांच्यापैकी एकाला कर्णधार बनवावे, असे सुचवले आहे.