आयपीएलचा सर्वात महागडा खेळाडू आता टॅक्स भरण्यातही नंबर १! ऋषभ पंतची मैदानाबाहेर मोठी बाजी
भारताचा यष्टिरक्षक फलंदाज ऋषभ पंत २०२५-२६ या आर्थिक वर्षासाठी २३.८४ कोटी रुपये प्राप्तिकर भरून उत्तराखंडमधील सर्वाधिक वैयक्तिक प्राप्तिकर भरणारा व्यक्ती ठरला आहे. उत्तराखंडच्या प्राप्तिकर विभागाच्या मुख्य आयुक्तांनी ही आकडेवारी जाहीर केली. पंतला बीसीसीआय करार, आयपीएलमधील वेतन, सामन्यांचे मानधन आणि व्यावसायिक जाहिरातींचे करार अशा विविध स्रोतांतून उत्पन्न मिळते. पंतने मागील वर्षाच्या तुलनेत दुप्पट कर भरला आहे.