“हे खेळभावनेच्या विरूद्ध आहे, तिने…” विनेशच्या पदकासाठी मास्टर ब्लास्टर सरसावला
भारतीय महिला कुस्तीपटू विनेश फोगट हिला पॅरिस ऑलिम्पिकमध्ये अतिरिक्त वजनामुळे अपात्र घोषित करण्यात आले. सचिन तेंडुलकरने तिच्या समर्थनार्थ पोस्ट शेअर केली आहे. त्याने विनेशला रौप्य पदक मिळावे अशी मागणी केली आहे आणि नियमांचा पुनर्विचार करण्याची सूचनाही केली आहे. सचिनने म्हटले की, विनेशने प्रामाणिकपणे कामगिरी केली असून ती रौप्य पदकाची हकदार आहे.