सात्विक-चिरागची ऐतिहासिक कामगिरी!
भारतीय बॅडमिंटन खेळाडू सात्विकसाईराज रंकीरेड्डी आणि चिराग शेट्टी यांनी चायना मास्टर्स २०२६ स्पर्धेत चिनी जोडीचा पराभव करून पहिल्यांदाच विजेतेपद मिळवले. त्यांनी ११-२१, २१-१३, २१-१७ असा विजय मिळवला. या विजयासह त्यांनी आपल्या कारकिर्दीतील १० वे बीडब्ल्यूएफ वर्ल्ड टूर विजेतेपदही मिळवले. या ऐतिहासिक विजयाने त्यांनी जागतिक बॅडमिंटनमधील सर्वोत्तम जोड्यांपैकी एक असल्याचे सिद्ध केले आहे.