“बांगलादेशातील लोकांच्या हत्येला शकीबही जबाबदार…”, शकीब अल हसनवर कठोर शब्दात टीका
बांगलादेश क्रिकेट बोर्डाने पाकिस्तानविरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी शकीब अल हसनला संघात समाविष्ट केले आहे. शकीब पूर्वी शेख हसीनाच्या सरकारमध्ये खासदार होते, त्यामुळे त्याच्या पुनरागमनाबद्दल साशंकता होती. विद्यमान क्रीडा मंत्री आसिफ महमूद यांनी शकीबच्या समावेशाला मान्यता दिली आहे. मात्र, काही माजी सदस्यांनी या निर्णयावर नाराजी व्यक्त केली आहे.