विनेश फोगटला रौप्य पदक देता येणं शक्य नाही? IOC प्रमुखांचा स्पष्ट नकार, म्हणाले…
भारतीय कुस्तीपटू विनेश फोगटला पॅरिस ऑलिम्पिकमध्ये ५० किलो वजनी गटात अंतिम सामन्याआधी वजन जास्त झाल्यामुळे अपात्र ठरवण्यात आले. तिने आंतरराष्ट्रीय क्रीडा लवाद (CAS) कडे अपील केले असून, रौप्य पदक देण्याची मागणी केली आहे. आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक महासंघाचे अध्यक्ष थॉमस बाक यांनी नियमानुसार दोन रौप्य पदके देणे शक्य नसल्याचे स्पष्ट केले आहे. CAS चा निकाल ऑलिम्पिक संपण्याआधी अपेक्षित आहे.