“तुमचा देश किती…”, विनेश फोगट प्रकरणावरून युनायटेड वर्ल्ड रेसलिंग प्रमुखांनी दाखवला आरसा
आंतरराष्ट्रीय क्रीडा लवाद (CAS) १३ ऑगस्ट रोजी विनेश फोगट प्रकरणाचा निकाल देणार आहे. याप्रकरणी आता युनायटेड वर्ल्ड रेसलिंगचे प्रमुख नेनाद लालोविक यांनी नियमांचे पालन आवश्यक असल्याचे सांगताना म्हणाले, "जे काही घडलं त्याबद्दल वाईट वाटतंय, पण तुम्ही कोणत्या देशाचे आहात, तुमचा देश किती मोठा आहे याचा काही संबंध नाही, खेळाडू हे खेळाडू असतात."