विनेश फोगटला रौप्यपदक मिळणार? कुस्तीच्या नियमातील ‘ही’ त्रुटी प्रकरणाला देणार वळण
विनेश फोगट अपात्रता प्रकरणाचा निकाल १३ ऑगस्टला आंतरराष्ट्रीय क्रीडा लवाद (CAS) देणार आहे. पॅरिस ऑलिम्पिकमध्ये अतिरिक्त वजनामुळे विनेशला अंतिम फेरीतून अपात्र ठरवण्याबाबत अपील केले आहे. UWW च्या नियमांमध्ये त्रुटी असल्याचे दिसून आले आहे. जर विनेशला जर अंतिम फेरी खेळण्याची परवानगी दिली नाही तर सुसाकीला रिपेचेजमध्ये भाग घेण्याची परवानगी नसावी. सुसाकीने पराभूत झाल्यानंतर या स्पर्धेचे कांस्यपदक जिंकले.