विनोद कांबळीच्या व्हायरल व्हिडीओनंतर नवा व्हिडीओ समोर; स्वतःच म्हणाला, “माझी प्रकृती…”
भारताचा माजी क्रिकेटपटू विनोद कांबळी याचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर त्याच्या प्रकृतीविषयी चिंता व्यक्त केली जात होती. मात्र, कांबळीने स्वतः सांगितले की तो ठणठणीत आहे. त्याचे शालेय मित्र रिकी आणि मार्कस कौटो यांनी त्याला भेट दिली आणि त्याच्या प्रकृतीविषयी समाधान व्यक्त केले. कांबळीने आपल्या फिटनेसबद्दल आणि क्रिकेटच्या आठवणींविषयी बोलताना सांगितले की तो आजही फिरकीपटूंना टोलवू शकतो.