कोहलीच्या फॅनने केला कहर! चाहत्याने असं काही केलं की विराटही जोडेल हात, मार्कशीट व्हायरल
बिहारमधील एका शाळकरी मुलाने त्याच्या मार्कशीटमध्ये स्वतःचे नाव 'विराट कोहली' आणि आईचे नाव 'सरोज कोहली' असे नमूद केले आहे. त्याने शाळेचा कोड '18 RCB' लिहिला आहे, जो विराट कोहलीच्या जर्सी क्रमांकाशी संबंधित आहे. ही मार्कशीट सोशल मीडियावर व्हायरल झाली असून लोक वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत. काहींनी मुलाबाबत चिंता व्यक्त केली आहे, तर काहींनी विराट कोहलीला ट्रोल केले आहे.