धोनी आणि रैनाने १५ ऑगस्ट रोजीच का जाहीर केली निवृत्ती? रैनाने केला मोठा खुलासा
महेंद्रसिंग धोनी आणि सुरेश रैनाने १५ ऑगस्ट २०२० रोजी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली. धोनीने आपल्या कार्यकाळात ३ आयसीसी ट्रॉफी जिंकल्या, तर रैना उत्कृष्ट क्षेत्ररक्षक आणि फलंदाज म्हणून ओळखला जातो. रैनाने निवृत्तीच्या दिवशीचा खुलासा करताना सांगितले की, धोनीचा जर्सी क्रमांक ७ आणि त्याचा ३ मिळून ७३ होतो, जो भारताच्या ७३ व्या स्वातंत्र्यदिनाशी जुळतो.