अक्षय खन्नाला धुरंदरच्या व्हायरल डान्सदरम्यान श्वास घेण्यास त्रास! ऑक्सिजन मास्क लावला…
Akshaye Khanna Dhurandhar Entry Dance: सध्या चर्चेत असलेल्या धुरंधर या चित्रपटातील कोरिओग्राफर विजय गांगुली यांनी सांगितले की ‘FA9LA’ गाण्याच्या शूटिंगदरम्यान अक्षय खन्नाला लडाखमध्ये कमी ऑक्सिजनमुळे त्रास झाला. लडाखमध्ये उंची जास्त असल्यामुळे तिथे ऑक्सिजन कमी असतो. त्यामुळे अक्षय खन्नासोबत एक जण छोटा ऑक्सिजन सिलिंडर घेऊन फिरत होता. गाणं शूट करताना त्याच्या प्राणवायूची पातळी कमी झाली होती. म्हणून प्रत्येक शॉटनंतर तो ऑक्सिजन मास्क लावायचा.