आंगणेवाडीच्या यात्रेसाठी धावणार कोकण रेल्वेच्या विशेष गाड्या; पाहा संपूर्ण वेळापत्रक
दरवर्षीप्रमाणे यंदाही २२ फेब्रुवारी २०२५ रोजी आंगणेवाडीच्या आई भराडी देवीचा यात्रोत्सव पार पडणार आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात मालवण तालुक्यातील हा यात्रोत्सव पार पडतो. यावेळी असंख्य भाविक मोठ्या भक्तीभावाने या यात्रेत सहभागी होतात. महाराष्ट्र, गोवा आणि कर्नाटकातील भाविक भराडी देवीच्या मंदिरात आशीर्वाद घेण्यासाठी येत असतात. या यात्रेसाठी मोठ्या संख्येने लोक कोकणात दाखल होतात. आंगणेवाडीच्या यात्रेनिमित्त प्रवाशांची वाढती गर्दी लक्षात घेता भारतीय रेल्वेने कोकणात विशेष अतिरिक्त ट्रेन्स सोडण्याचा निर्णय घेतला आहे.