भारती सिंगने दिला बाळाला जन्म, वॉटर ब्रेक झाल्याने रुग्णालयात केलं दाखल, याचा अर्थ काय…
Bharti Singh Second Baby Water Broke: कॉमेडियन भारती सिंग आणि तिचा पती हर्ष लिंबाचिया दुसऱ्यांदा आई-वडील झाले आहेत. १९ डिसेंबर रोजी पहाटे वॉटर ब्रेक (पाणी जाणं किंवा मूत्रण फुटणं) झाल्याने तिला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. काही तासांतच तिने गोंडस मुलाला जन्म दिला. बाळाच्या जन्मावेळी तिचा पती हर्ष तिच्यासोबतच होता. विशेष म्हणजे, त्याच दिवशी भारतीला ‘लाफ्टर शेफ्स’ या टीव्ही शोचे शूटिंग करायचे होते, पण वॉटर ब्रेक झाल्यामुळे हे घडले.