पायऱ्या चढताना धाप लागते, श्वास घेण्यास त्रास होतोय? करा ‘हे’ सोपे उपाय अन् सुसाट चाला
Breathing Difficulty : पायऱ्या चढणं हा केवळ चांगला व्यायामच नाही, तर तो आपले हृदय आणि फुप्फुसाचे आरोग्य किती चांगल्या स्थितीत आहे हे प्रतिबिंबित करतो. पण, हल्ली प्रौढांपासून तरुणांनाही काही पायऱ्या चढल्यानंतर अस्वस्थता जाणवते, धाप लागते. तुम्हीही या समस्येचा सामना करत असाल, तर काळजी करू नका. याबाबत प्रसिद्ध फिटनेस ट्रेनर व आहारतज्ज्ञ सोनिया बक्षी यांनी सविस्तर उपाय सांगितले आहेत.