पुरूषांनो पाणी न पिताही वारंवार लघवीला होतंय? असू शकतो ‘हा’ कॅन्सर; वेळीच ही लक्षणं ओळखा
Cancer Early Symptoms in Men: जर पुरूषांना वारंवार लघवी होत असेल आणि ते याला वृद्धत्वाचे लक्षण आहे असे समजून त्याकडे दुर्लक्ष करत असतील तर ते खूप धोकादायक ठरू शकतं. डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार, ५० वर्षांपेक्षा जास्त वय असणाऱ्या पुरूषांमध्ये हे प्रोटेस्ट कॅन्सरचं सुरूवातीचं लक्षणदेखील असू शकतं.
प्रोस्टेट कॅन्सरची सर्वात मोठी समस्या म्हणजे सुरुवातीच्या टप्प्यात त्याची लक्षणे स्पष्ट दिसत नाहीत. बऱ्याच प्रकरणांमध्ये, हा आजार हळूहळू आणि कोणत्याही वेदनेशिवाय वाढतो. म्हणूनच थोड्याशा संशयावर चाचणी करणे आवश्यक मानले जाते.