सर्दी खोकला कमीच होत नाहीय? मग प्रसिद्ध गायकाकडून घ्या खास टीप्स, रातोरात कफ बाहेर पडेल…
Cough Cold Remedy: हिवाळ्याच्या काळात सर्दी, खोकला, नाक वाहणे आणि घशात दुखणे अशा समस्या खूप वाढतात. जर तुम्हालाही वारंवार नाक वाहणे, खोकला किंवा थकवा जाणवत असेल, तर प्रसिद्ध पंजाबी गायक दिलजीत दोसांझ याने सांगितलेला एक घरगुती उपाय तुमच्यासाठी उपयोगी ठरू शकतो. दिलजीतने सोशल मीडियावर बेसनाचा शिरा कसा बनवायचा याची रेसिपी शेअर केली आहे. तो स्वतः हिवाळ्यात तंदुरुस्त आणि निरोगी राहण्यासाठी हा शिरा घेतो. चला तर मग या उपायाबद्दल अधिक जाणून घेऊया.