Dahi Handi Wishes 2026: बोल बजरंग बली की जय! दहीहंडीच्या प्रियजनांना द्या खास शुभेच्छा…
Dahi Handi Wishes 2026: भाद्रपद महिन्याच्या कृष्ण पक्षाच्या आठव्या तिथीला श्रीकृष्णाचा जन्म झाला, अशी मान्यता आहे. हा दिवस श्रीकृष्ण जन्माष्टमी म्हणून साजरा केला जातो. श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या निमित्त्याने महाराष्ट्रात दहीहंडी उत्सव मोठ्या उत्साहात आणि धुमधडाक्यात साजरा केला जातो. मुंबई आणि ठाण्यात दहीहंडी हा सण उत्साहात साजरा केला जातो. गोविंदा रे गोपाळा या घोषणांनी संपूर्ण परिसर दुमदुमून जातो आणि सगळीकडे जल्लोष पाहायला मिळतो.