सकाळी उठताच रिकाम्या पोटी पाणी पिताय? प्रेशर येण्यासाठी ‘ही’ सवय चांगली की वाईट…
Constipation Relief Remedies: सकाळी उठल्यावर पाणी पिण्याची सवय लावावी असे अनेकदा सांगितले जाते. यामुळे पोट साफ होण्यास मदत होते असे मानले जाते. हे पूर्णपणे चुकीचे नाही, कारण याचा संबंध पचनसंस्था आणि शरीरातील पाण्याच्या महत्त्वाशी आहे. बद्धकोष्ठता ही एक सामान्य समस्या आहे. जेव्हा मल कठीण होतो आणि बाहेर टाकायला त्रास होतो, तेव्हा बद्धकोष्ठता होते.