अंडी खाल्ल्याने कॅन्सर होतो? FSSAI ने सांगितलं काय खरं काय खोट, डॉक्टरांनीही दिली माहिती
Eggs Cause Cancer FSSAI: भारतीय अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरण (FSSAI) यांनी अलीकडे स्पष्ट केले आहे की, भारतात मिळणारी अंडी मानवी सेवनासाठी पूर्णपणे सुरक्षित आहेत. सोशल मीडियावर अंडी खाल्ल्याने कॅन्सर होतो, असे जे दावे केले जात आहेत, ते FSSAI ने फेटाळून लावले आहेत. अधिकृत निवेदनात FSSAI ने सांगितले की, अंडी आणि कॅन्सर धोका यांचा संबंध जोडणे दिशाभूल करणारे, वैज्ञानिक आधार नसलेले असून, त्यामुळे लोकांमध्ये उगाच भीती पसरू शकते.