घटस्थापना म्हणजे काय? धार्मिक विधीमागे दडलेली कृषिसंस्कृती अन् विज्ञानाचं रहस्य काय?
घटस्थापनेचा खरा संदेश म्हणूनच केवळ धार्मिक विधीपुरता मर्यादित नाही. एका छोट्याशा बीजात भविष्यातलं अन्न, वनस्पती, शेती आणि जीवनाची शक्यता दडलेली असते. घटातलं पाणी आपल्याला जलाचं महत्त्व सांगतं, मातीत रुजलेलं बीज अन्ननिर्मितीची आठवण करून देतं, विड्याची आणि आंब्याची पानं आपल्या वनस्पतीपरंपरेशी जोडतात आणि काही दिवसांत उगवणारा हिरवा अंकुर जीवनसातत्याचं दर्शन घडवतो.