गुढीपाडव्याला ‘या’ सोप्या पद्धतीने काढा हटके रांगोळी! दारात अगदी शोभून दिसेल, पाहा VIDEO
Gudi Padwa Rangoli: हिंदू नववर्षाची सुरुवात गुढीपाडव्यापासून होते. विशेषतः महाराष्ट्रात गुढीपाडव्याच्या सणाचा उत्साह मोठ्या प्रमाणात पाहायला मिळतो. गुढीपाडवा हा साडेतीन मुहूर्तांपैकी एक मुहूर्त आहे. नवीन वर्षाच्या स्वागतासाठी अनेकजण घरोघरी गुढी उभारतात. या नवीन वर्षाची गोड सुरूवात म्हणून गुढीच्या बाजुला तसेच दाराबाहेर रांगोळी काढली जाते. प्रत्येक गृहिणीली, स्त्रीला आपल्या दारातली रांगोळी ही छान आणि हटके अशी हवी असते. आपला कोणताही सण रांगोळीशिवाय पूर्ण होत नाही.