Gudi Padwa Wishes: गुढीपाडव्याला प्रियजनांना पाठवा ‘या’ खास मराठमोळ्या शुभेच्छा…
Gudi Padwa 2026 Wishes in Marathi: दरवर्षी चैत्र महिन्याच्या शुक्ल पक्षातील प्रतिपदा तिथीला गुढीपाडवा साजरा करण्याची परंपरा आहे. साडेतीन मुहूर्तांपेकी एक म्हणून गुढीपाडव्याची ओळख आहे. या दिवशी हिंदू नववर्षाची सुरुवात होते. या सणाच्या निमित्ताने घरोघरी उंच गुढी उभारून नववर्षाचे जल्लोषात स्वागत केले जाते. त्यानुसार यंदा गुढीपाडव्याचा सण १९ मार्च २०२६ रोजी साजरा केला जाणार आहे. तर यंदाच्या गुढीपाडव्याला तुम्ही नातेवाईक, प्रियजन आणि मित्र परिवाराला शुभेच्छा पाठवून, त्यांचा आनंद अधिक द्विगुणीत करू शकता.