पावसाळा सुरू होताच सांधेदुखी आणि थकवा का वाढतो? ‘वातप्रकोप’ टाळण्यासाठी महत्त्वाचा सल्ला
आधुनिक हवामानशास्त्रानुसार भारतात पाऊस आणणाऱ्या वाऱ्यांना नैऋत्य मोसमी वारे म्हटले जाते. परंतु, प्राचीन सुश्रुतसंहिता आणि आयुर्वेदानुसार या पश्चिमेकडील वाऱ्यांना ‘वारुण वारे’ असे संबोधले गेले आहे. निसर्गातील या बदलांचा थेट परिणाम मानवी शरीरावर होत असतो. पावसाळ्यातील थंड आणि ओलसर वातावरणामुळे शरीरात वाताचा प्रकोप कसा होतो आणि आरोग्यावर त्याचा काय परिणाम होतो, हे समजून घेणे अत्यंत महत्त्वाचे आहे. पावसाळ्यात आरोग्याची काळजी कशी घ्यावी आणि वातप्रकोप कसा टाळावा, याचे हे सविस्तर आयुर्वेदिक मार्गदर्शन.