कंबरदुखीचा बेल्ट, नी-कॅप खरंच उपयोगी की सवय लावणारे? हे धोके नक्की जाणून घ्या!
कंबरदुखी आणि गुडघेदुखीवर बेल्ट आणि नी-कॅपचा वापर सध्या फॅशन झाली आहे. हे साधनं तात्पुरता आराम देतात, पण दीर्घकाळ वापरल्यास शरीराची नैसर्गिक क्षमता कमी होऊ शकते. सतत बाह्य सपोर्ट वापरल्यास स्नायू अकार्यक्षम होतात आणि मानसिक अवलंबित्व वाढतं. योग्य वापर आणि फिजिओथेरेपीद्वारे स्नायूंची ताकद वाढवून नैसर्गिक क्षमता टिकवणं महत्त्वाचं आहे.