कंबर-गुडघेदुखीसाठी दिवसभर बेडरेस्ट घेताय?; जाणून घ्या विश्रांती की हालचाल, योग्य काय?
कंबरदुखी किंवा सांधेदुखी झाली की दिवसभर अंथरुणावर पडून राहणे योग्य की हळूहळू हालचाल करणे फायदेशीर? आधुनिक फिजिओथेरपी आणि वैद्यकशास्त्रानुसार दीर्घकाळ बेडरेस्ट घेतल्यास स्नायू कमकुवत होतात आणि सांधे आखडतात. दुखापतीच्या सुरुवातीच्या काळात विश्रांती महत्त्वाची असली, तरी शरीर पुन्हा सक्षम करण्यासाठी नियंत्रित हालचाल हीच औषधासारखी काम करते. पूर्ण विश्रांती आणि सक्रिय राहणे यातील योग्य समतोल कसा साधावा, याविषयीची सविस्तर आरोग्य माहिती.