७-८ तास झोपूनही सकाळी थकवा जाणवतोय? ‘या’ छुपे शत्रूंमुळे नर्वस सिस्टीम होतेय ओव्हरलोड!
आजकाल अनेकांना पुरेशी झोप असूनही थकवा जाणवतो. याचे मुख्य कारण म्हणजे झोपेची गुणवत्ता, सततचा मानसिक ताण, कमी हालचाल आणि नर्वस सिस्टमचा ओव्हरलोड. फक्त झोप पुरेशी असणं पुरेसं नाही; चांगली झोप, योग्य हालचाल, मानसिक विश्रांती आणि संतुलित दिनचर्या आवश्यक आहे. थकवा कमी करण्यासाठी नियमित व्यायाम, स्क्रीन हायजिन, तणाव व्यवस्थापन आणि फिजिओथेरेपी उपयुक्त ठरू शकतात.