मधुमेह- ‘या’ महत्त्वाच्या चाचण्या न केल्यास वाढू शकतो किडनी-हृदयविकाराचा धोका!
मधुमेह असणाऱ्यांनी केवळ रक्तातील साखर तपासून चालत नाही. अनेकदा रुग्णांचे क्रिएटिनिन वाढल्याने किडनीवर परिणाम होतो. यामुळेच डॉक्टरांच्या सल्ल्याने ठराविक अंतराने HbA1c, ब्लड प्रेशर, लिपिड प्रोफाईल आणि किडनीची तपासणी करणे अनिवार्य आहे. वेळीच काळजी न घेतल्यास हृदय, डोळे आणि पायांच्या नसांवर गंभीर परिणाम होऊ शकतो. मधुमेहाशी लढताना कोणत्या आघाड्यांवर कडक पहारा ठेवावा, याची सविस्तर माहिती प्रसिद्ध डॉ. उज्ज्वला दळवी यांनी दिली आहे.