खूप वेळ गाडी चालवल्यावर मान-कंबर का दुखते? प्रवासातील वेदना टाळण्यासाठी फॉलो करा या टिप्स
दैनंदिन प्रवासात दुचाकी किंवा चारचाकी चालवल्यानंतर मान आणि कंबरदुखीची समस्या उद्भवते. याचे कारण म्हणजे चुकीचे पोश्चर आणि स्थिर बसण्याचा ताण. दुचाकीवर डायनॅमिक लोड तर चारचाकीत स्टॅटिक लोड जास्त असतो. योग्य पोश्चर, नियमित ब्रेक, हालचाली आणि फिजिओथेरेपीने या समस्यांवर मात करता येते. प्रवासात योग्य काळजी घेतल्यास वेदना कमी होतात आणि प्रवास सुखकर होतो.