Eating Alone Impact on Health : एकटं बसून जेवल्याने नैराश्य वाढतं का? संशोधन काय सांगतं?
सतत एकटं बसून खाण्याची सवय केवळ एक साधी गोष्ट नसून, तिचा थेट संबंध तुमच्या मानसिक आणि मेंदूच्या आरोग्याशी असू शकतो. संशोधनानुसार, एकटं बसून जेवणाऱ्यांमध्ये नैराश्य वाढू शकते आणि मेंदूवर परिणाम होऊ शकतो. वयोवृद्धांमध्ये एकत्र जेवण मानसिक स्वास्थ्यासाठी फायदेशीर ठरते. 'वर्ल्ड हॅपीनेस रिपोर्ट'नुसार, एकत्र जेवणाऱ्यांचे जीवन अधिक आनंदी असते. एकट्याने जेवल्याने मेंदूच्या कार्यक्षमतेवर परिणाम होतो, असेही संशोधन दर्शवते.