कधी सतत खात राहतो, तर कधी जेवण्याची इच्छाच होत नाही; असं नेमकं का घडतं?
कधीकधी आपलं खाण्याच्या सवयींवर नियंत्रण राहत नाही. काहींना भूक नसतानाही खाण्याची इच्छा होते, तर काहींना तणावामुळे भूक मंदावते. दिवसभरातील ताणामुळे गोड, तेलकट पदार्थ खाण्याची इच्छा वाढते. तणावाच्या काळात खाण्याच्या सवयींवर नियंत्रण ठेवण्यासाठी संतुलित आहार, पुरेशी झोप, नियमित व्यायाम आणि तज्ज्ञांचा सल्ला घेणे महत्त्वाचे आहे. तणावामुळे खाण्याच्या सवयींमध्ये बदल झाल्यास त्याकडे दुर्लक्ष करू नये.