व्यायाम सुरू करताच शरीर दुखू लागतं? ‘नो पेन, नो गेन’ खरंच कितपत योग्य?
व्यायाम सुरू केल्यावर स्नायू आणि सांधे दुखणे ही अत्यंत नेहमीचीच समस्या आहे. अनेकांना व्यायामाच्या सुरुवातीला दोन-तीन दिवसांत तीव्र वेदना जाणवू लागतात, ज्याला वैद्यकीय भाषेत DOMS (Delayed Onset Muscle Soreness) म्हटले जाते. मात्र, प्रत्येक वेदना धोक्याची नसते. शरीर नवीन ताणाशी जुळवून घेत असताना हे बदल होतात. अशा वेळी व्यायाम पूर्णपणे बंद न करता कोणती वेदना सामान्य आहे आणि कोणती धोक्याची, हे ओळखणे गरजेचे आहे.