व्यायाम करूनही शरीर साथ देत नाही? जाणून घ्या काय आहे शरीराची ‘टिश्यू कपॅसिटी’?
आपण रोजच्या हालचालींमध्ये शरीरावर येणाऱ्या भाराचं व्यवस्थापन करणं महत्त्वाचं आहे. योग्य प्रमाणात आणि योग्य पद्धतीने भार दिल्यास शरीर मजबूत होतं, पण अचानक वाढलेला किंवा चुकीच्या पद्धतीने आलेला भार वेदना निर्माण करतो. कमी हालचाल करणंही धोकादायक आहे. फिजिओथेरेपीद्वारे योग्य हालचालींचं नियोजन केल्यास वेदना कमी होतात. योग्य लोड मॅनेजमेंटमुळे शरीर मजबूत होतं आणि वेदना टाळता येतात.