विषही शरीरातून बाहेर काढणारे मीठ! पण ‘या’ आजारात चुकूनही खाऊ नका; वाचा मोलाचा सल्ला
आयुर्वेदानुसार मिठाचे औषधी गुणधर्म आहेत. शरीरातील विष बाहेर काढणे, खोकला, मूतखडा, पोटदुखी, मलावरोध, आम्लपित्त, कृमी, मूत्रविकार, जखम, सांधेदुखी, दातांचे विकार यावर मीठ उपयुक्त आहे. मात्र, मिठाचा अतिवापर धोकादायक ठरू शकतो. विशेषतः उच्च रक्तदाब, मधुमेह, स्थूलता असलेल्या व्यक्तींनी मिठाचा वापर कमी करावा. शारीरिक श्रम करणाऱ्यांना मिठाचा वापर योग्य आहे.