‘माऊथ कंडोम’ म्हणजे काय? ओरल कॅन्सर टाळण्यासाठी याचा वापर खरंच होतो का?
HPV लसीशिवाय Oral कॅन्सरचा धोका कमी करण्यासाठी कंडोम आणि डेंटल डॅम्ससारखी (माउथ किंवा टंग कंडोम) बॅरियर महत्त्वाची भूमिका बजावतात, असे तज्ज्ञांचे मत आहे. HPV हा जगभरात सर्वाधिक आढळणाऱ्या लैंगिक संसर्गांपैकी एक असून तोंड आणि घशाच्या कॅन्सरशी त्याचा संबंध आहे. जागतिक आरोग्य संस्थांच्या मते, HPV तोंडावाटे होणार्या संपर्कातूनही पसरू शकतो आणि घशात संसर्ग होवून ओरोफॅरिंजियल कॅन्सरसाठी (घशाचा कर्करोग) कारणीभूत ठरू शकतो.