Pain Awareness Month: शरीरातील वेदनेची तीव्रता कशावर ठरते? (भाग १)
सप्टेंबर महिना हा 'आंतरराष्ट्रीय वेदना जागरूकता महिना' म्हणून पाळला जातो. वेदना ही केवळ एक शारीरिक संवेदना नसून ती मानवी मेंदूचा अनुभव आणि प्रतिसाद आहे. वेदनेची तीव्रता ही मानसिक, भावनिक, सामाजिक आणि सांस्कृतिक घटकांवरही अवलंबून असते. जुनाट किंवा दीर्घकालीन वेदना (क्रॉनिक पेन) समजून घेणे, त्याबाबत जागरूकता निर्माण करणे आणि योग्य उपचार पद्धती स्वीकारणे काळाची गरज ठरली आहे. वेदना ही फक्त सहन करण्याची गोष्ट नसून योग्य वैद्यकीय मार्गदर्शनाने तिचे व्यवस्थापन करणे आवश्यक आहे