जांभूळ म्हणजे कल्पवृक्ष आणि देवाचे फळ? जांभळाच्या सालीचा काढा माउथवॉश म्हणून का वापरतात?
काळसर निळसर जांभळांचा रंग चटकन लक्ष वेधून घेतो. कवितेत जांभूळ हा प्रियकराचा लाडका. यावर्षी पाऊस सुरू झाला तरी जांभळाच्या जांभळाईने बाजार सजला आहे. याच जांभळाच्या अतिरिक्त उत्पादनामुळे अनेक जुन्या समजुती पुन्हा एकदा चर्चेत आल्या. त्यातील एक समजूत ही चक्क दुष्काळाशी संबंधित आहे. समजूत काहीही असली तरी जांभळाच्या गुणधर्मामुळे ते दैवी फळ मानले जाते.