आता लॅबमध्ये तयार होतोय ‘मिनी मेंदू’; जाणून घ्या ‘मोड्युलर ब्रेन’ची रंजक कथा
मानवी मेंदू आता लॅबमध्ये तयार करणे शक्य झाले असून जैवअभियांत्रिकीच्या साहाय्याने वैज्ञानिकांनी 'मोड्युलर ब्रेन' आणि 'ऑरगॅनॉइड्स'ची जुळणी करण्यात यश मिळवले आहे. स्टेम सेल्सच्या मदतीने पेट्री डिशमध्ये त्रिमितीय मिनी मेंदू विकसित केला जात असून, यामुळे मेंदूच्या व्याधी आणि औषधांच्या चाचण्यांवर क्रांतिकारी संशोधन सुलभ होणार आहे.