रात्री पायात गोळे येतात? ब्लड शुगरमधील चढ-उतार कारणीभूत असू शकतात का? डॉक्टर काय सांगतात?
रात्री झोपताना पायात गोळे येण्याचं कारण अनेकदा पाणी कमी पिणं, थकवा किंवा जास्त चालणं असं मानलं जातं. मात्र, वारंवार असा त्रास होत असेल तर रक्तशर्करेची पातळी तपासणं गरजेचं आहे. रक्तशर्करेतील बदलांमुळे शरीरातील खनिजं कमी होऊन स्नायूंमध्ये गोळे येऊ शकतात. मधुमेह असलेल्या व्यक्तींमध्ये हा त्रास अधिक जाणवतो. तज्ज्ञांच्या मते, रक्तशर्करेसोबत इतर कारणांचाही विचार करणं आवश्यक आहे.